संपर्क करा आमच्या शाखा

इतिहास

ज्ञानदीपचा गौरवशाली प्रवास

ज्ञानदीप — १९७८ पासून विश्वासाची परंपरा
स्थापना — २ सप्टेंबर १९७८

२ सप्टेंबर १९७८ रोजी बृहन्मुंबईच्या पूर्व उपनगरातील सायन-चूनाभट्टी भागात 'ज्ञानदीप'ची पायाभरणी झाली. केवळ ३०० सभासद आणि अवघ्या ₹१३,००० च्या प्राथमिक भागभांडवलासह या प्रवासाला सुरुवात झाली. खासगी सावकारांच्या जाचातून आणि आर्थिक शोषणातून या भागातील कष्टकरी व गिरणी कामगारांना मुक्त करणे, हाच संस्था स्थापनेमागील मुख्य उद्देश होता. आर्थिक स्थैर्यासाठी झगडणाऱ्या या वर्गाला ज्ञानदीपच्या रूपाने एक भक्कम आर्थिक आधार मिळाला.

आज त्याच छोट्याशा रोपट्याचा एक महावृक्ष झाला असून ज्ञानदीप एक भक्कम वित्तीय संस्था म्हणून उभी आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र आता संपूर्ण महाराष्ट्रात पसरले असून, कोअर बँकिंग सिस्टीम (CBS) ने जोडलेल्या ११० शाखा, ८ विभागीय कार्यालये आणि एका अत्याधुनिक प्रशासकीय मुख्य कार्यालयाद्वारे ग्राहकांना अविरत सेवा दिली जात आहे.

"आपल्यापाशी असलेले ज्ञान इतरांना द्यावे" या मूळ ब्रीदवाक्याचा वारसा जपत, आमची संस्था आज राज्यातील इतर अनेक सहकारी पतसंस्थांना योग्य मार्गदर्शन आणि दिशा दाखवण्याचे मोलाचे कार्य अभिमानाने करत आहे.

महत्त्वाचे टप्पे
१९७८ — पायाभरणी

'महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०' अंतर्गत नोंदणीकृत. मुंबईतील कष्टकरी समाजाला सुलभ आणि समान आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाने संस्थेची स्थापना झाली.

२०१२ — कोअर बँकिंग प्रणाली

सर्व शाखांमध्ये 'कोअर बँकिंग सोल्यूशन्स (CBS)' यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आले; ज्यामुळे सभासदांना सर्व शाखांमधून त्वरित आणि सुलभ रिअल-टाइम व्यवहार करणे शक्य झाले.

२०१७ — प्रतिनिधींसाठी दैनंदिन ठेव संकलन ॲप

पिग्मी (दैनिक) एजंट्ससाठी खास मोबाईल ॲप सुरू करण्यात आले. याद्वारे ठेव संकलन डिजिटल पद्धतीने होऊन, सभासदांना घरबसल्या सुरक्षित आणि जलद सेवा मिळणे सुरू झाले.

२०२५ — डिजिटल ज्ञानदीप मोबाईल ॲप्लिकेशन

अत्याधुनिक 'डिजिटल ज्ञानदीप मोबाईल ॲप' बाजारात आणले. यामुळे आता सभासद कधीही, कुठेही सुरक्षितपणे पैसे ट्रान्सफर करू शकतात, खात्यावर लक्ष ठेवू शकतात आणि प्रत्येक व्यवहाराचे अपडेट्स मिळवू शकतात.

११०
शाखा
४७
वर्षांचा अखंड विश्वास
१०००+
कुशल कर्मचारी
विभागीय कार्यालये