'ज्ञानदिप को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी' आपल्या सर्व सभासदांना प्रगत Core Banking Services पुरवते. याद्वारे सभासदांना त्यांच्या खात्याची आणि गुंतवणुकीची संपूर्ण माहिती कोणत्याही शाखेतून अगदी सहज, सुरक्षित आणि रिअल-टाइममध्ये (लाईव्ह) मिळू शकते.
या Centralised बँकिंग प्रणालीमुळे सर्व ग्राहकांची खाती एकाच प्लॅटफॉर्मवर जोडली गेली आहेत; ज्यामुळे कधीही आणि कुठेही बँकिंग करणे शक्य झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आमच्या सर्व सभासदांना अत्यंत सोयीस्कर, कार्यक्षम आणि ग्राहकस्नेही बँकिंग सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
कोणत्याही शाखेतून पैशांचे डिपॉझिट, विथड्रॉवल आणि बॅलन्सची चौकशी करा अगदी जलद आणि अचूकपणे! आमच्या संपूर्ण नेटवर्कवर तुमच्या खात्याची माहिती नेहमी त्वरित अपडेट केली जाते.
आमच्या एकत्रित प्लॅटफॉर्मद्वारे (Centralised Platform) वेगवेगळ्या खात्यांमध्ये सहज पैसे ट्रान्सफर करा. यामुळे रक्कम त्वरित जमा होण्याची खात्री मिळते आणि प्रत्येक व्यवहारात पूर्ण पारदर्शकता राहते.
'ज्ञानदिप'च्या कोणत्याही शाखेत जा आणि तुमच्या खात्याचे व्यवहार हाताळा. आमची एकत्रित प्रणाली (Centralised System) तुम्ही कुठेही असलात, तरी तुम्हाला नेहमी एकाच दर्जाची आणि तत्पर सेवा मिळवून देते.
'ज्ञानदीप' च्या कोणत्याही शाखेला भेट द्या आणि आमच्या कोअर बँकिंग प्रणालीचा आनंद घ्या. जलद, सुरक्षित आणि तुमच्या सेवेत सदैव तत्पर!